आपल्या कडे मार्केटिंग आणि सेल्स अशा दोन वेगळ्या टीम शक्यतो नसतात किंबहुना मार्केटिंग ,सेल्स अँड पोस्ट सेल्स सर्व प्रक्रिया एकच टीम आणि व्यक्ती करत असते . अशा वेळी काय करायचं ते पाहूया . प्रॉपर्टी /फ्लॅट विक्री मध्ये मार्केटिंग म्हणजे काय? १. रीच - म्हणजे जास्तीजास्त टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहचणे २. कन्टेन्ट - म्हणजे आपण त्यांना आपल्या प्रोजेक्ट आणि प्रॉडक्ट बद्दल काय सांगतोय ती माहिती. ३. ह्यॅमररिंग - म्हणजे त्या रिच ला आपण हा कन्टेन्ट किती वेळा सांगतोय ४. एन्कवायरी - म्हणजे संभाव्य गिरायिका कडून विचारपूस व तुमच्या कडे फ्लॅट घेण्याची इच्छा दर्शविणे. शक्यतो , ह्या टप्यातला पहिला भाग हा मार्केटिंग असतो व उर्वरित सेल्स म्हणजे जेव्हा तुम्हाला लक्षात येतं कि ह्या एन्कवायरीला आता हे पटलं आहे कि तुमच्या कडे फ्लॅट घ्याला हरकत नाही आणि त्यांना जसा हवा तास फ्लॅट तुमच्या कडे उपलब्ध आहे आणि तो घेण्यासाठीची आर्थिक बाजू सुद्धा जमेची आहे, त्या क्षणी मार्केटिंग थांबतं किव्हा थांबवावं आणि सेल्स सुरु होतो. मग सेल्स मध्ये नेमकं काय काय करावं लागतं आणि त्याचे स्टेजेस काय ? १. एक्स्प