आपल्या कडे मार्केटिंग आणि सेल्स अशा दोन वेगळ्या टीम शक्यतो नसतात किंबहुना
मार्केटिंग ,सेल्स अँड पोस्ट सेल्स सर्व प्रक्रिया एकच टीम आणि व्यक्ती करत असते .
अशा वेळी काय करायचं ते पाहूया .
प्रॉपर्टी /फ्लॅट विक्री मध्ये मार्केटिंग म्हणजे काय?
१. रीच - म्हणजे जास्तीजास्त टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहचणे
२. कन्टेन्ट - म्हणजे आपण त्यांना आपल्या प्रोजेक्ट आणि प्रॉडक्ट बद्दल काय सांगतोय ती माहिती.
३. ह्यॅमररिंग - म्हणजे त्या रिच ला आपण हा कन्टेन्ट किती वेळा सांगतोय
४. एन्कवायरी - म्हणजे संभाव्य गिरायिका कडून विचारपूस व तुमच्या कडे फ्लॅट घेण्याची इच्छा दर्शविणे.
शक्यतो , ह्या टप्यातला पहिला भाग हा मार्केटिंग असतो व उर्वरित सेल्स
म्हणजे जेव्हा तुम्हाला लक्षात येतं कि ह्या एन्कवायरीला आता हे पटलं आहे कि तुमच्या कडे फ्लॅट घ्याला हरकत नाही आणि त्यांना जसा हवा तास फ्लॅट तुमच्या कडे उपलब्ध आहे आणि तो घेण्यासाठीची आर्थिक बाजू सुद्धा जमेची आहे, त्या क्षणी मार्केटिंग थांबतं किव्हा थांबवावं आणि सेल्स सुरु होतो.
मग सेल्स मध्ये नेमकं काय काय करावं लागतं आणि त्याचे स्टेजेस काय ?
१. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट - म्हणजे वर म्हटल्या प्रमाणे आता तुमच्या कडे असंलेला फ्लॅट आणि त्याचं बजेट सर्व काही जमतंय असं दिसणं आणि कस्टमर रेट नेगोशिएशन च्या मानसिकतेत येणं हि पहिली पायरी.
२. नेगोशिएशन पूर्व चर्चा व माहिती - आता मार्केटिंग मोड बंद करून व्यवहार करण्यासाठी लागणारी सर्व माहिती आणि तपशील चर्चा करणे व ठरवणे आणि ते योग्य पद्धतीनं ह्या संभाव्य ग्राहकाला समजावून सांगणं खूप महत्वाचा टप्पा आहे. सेल्स प्रोसेसच्या ह्या टप्प्या मध्ये आपण मार्केटिंग मोडे मध्ये असू तर बऱ्याच चुका होण्याच्या शक्यता असतात त्यामुळे ह्या टप्यात तुम्ही जेव्हा जाता , तेव्हा तुमची तयारी पूर्ण हवी आणि ग्राहकाची मानसिकता सुद्धा त्या पद्धतीनं तयार करायला हवी
३. नेगोशिएशन - शक्य तो दर हा फिक्स असावा आणि दार कमी कारणे टाळावं , पण बऱ्याचदा तो करावा लागतो व त्याची एक स्वतंत्र शैली आहे ती सविस्तर नंतर बोलू पण समोरच्याला हे सांगणं खूप गरचेच आहे कि आता आपण नेगोशिएशन करणार आहोत आणि त्या अंती तुम्ही बुक करणं गरजेचं आहे. नाही तर हा टप्प टाळावा . शक्यतो ज्यावेळी बुकिंग करणार असतील त्याच वेळी निगोसिएशन करावी आधी केली तर त्याचा परिणाम योग्य होईल असा नाही .
४. क्लोजर - म्हणजे बुकिंग घेणं, आता नेगोशिएशन मध्ये जे ठरलं त्या अनुषंगाने फ्लॅट बुक करण्याची प्रक्रिया. ह्या मध्ये बरेच इतर लयेर्स आहेत ते आपण पुढे पाहू.
आता सेल्स मध्ये वरील चार टप्प्यानं मध्ये बरेच छोटे छोटे मुद्दे आहेत जसे लोनची गरज व पात्रता जोखणे, सरकारी योजने मध्ये बसतात कि नाही ह्याची चाचपणी , अग्रीमेंट मधील मुद्दे व ते करण्याची तयारी, वस्तू,शुभ वेळ व इतर मुद्दे.
थोडक्यात आपल्या टीमला आपण हे सांगणं गरजेचं आहे कि - मार्केटिंग सारखंच सेल्स केलं ,तर सेल्स क्लोज करणे अवघड जात आणि सेल्स म्हणजे मार्केटिंग नाही .
आता सेल्स चे अनेक पद्धती आणि प्रक्रिया आहेत ते आपण पुढील भागात जाणून घेऊ.
सेल्स टीप १ - मार्केटिंग कूठ थांबतं आणि सेल्स कधी सुरु होतो ह्याचा ज्याने अभ्यास केला तो बुकिंग जास्तीजास्त आणि लौकर करतो.
धन्यवाद.
अद्वित दीक्षित
लिडो अँप - ट्राइब अँपसोफ्ट
पुणे -कोल्हापूर
Comments
Post a Comment