आजचा ईंटरनेट ग्राहक !
सर्वत्र इंटरनेटचे न दिसणारे जाळे आणि त्यात आपण सर्व मुक्त पणे मोबाईल वर स्वार होऊन एका व्हर्चुअल जगात स्वछंद वावरत आहोत आणि एका नव्या आयामात जगत आहोत.हे नवं जग अनुभवत असताना आपण नकळत या ईंटरनेट चे ग्राहक बनलो आहोत. इंटरनेट हा कुणा एकाच्या मालकीचा नाही व त्यावर कोणी हक्क बजावू शकत नाही.तरीही तो सुव्यवस्थित पणे आपल्याला एक किफायतशिर ग्राहक बनवत आहे. आपण केलीली प्रत्येक कृती ही या इंटरनेटवर मोजली व मापली जाते. आणि त्याची दखल योग्य तो सेवा देणारा किंवा एखादी कंपनी घेते. आपण इंटरनेटवर जे काही करतो त्याचे थेट रूपांतर डेटा मध्ये होते व त्या डेटाचा उपयोग योग्य त्या कंपन्या योग्य त्या कारणासाठी करून घेतात. यामुळे आपल्याला न कळत या बिग डेटाचा बिग कॅश होतो. यामध्ये सर्वच कंपन्या सामील आहेत व या डेटाचा इंधनासारखा वापर होतो. हा इंटरनेट आपल्या न कळत आपल्याबद्दल बरेच काही जाणतो व तो आपल्याला उपयोगी, गरजेच्या किंवा आवडीच्या प्रमाणे योग्य ती सेवा किंवा प्रॉडक्ट आपल्याला दाखवून न कळत आपल्याला विकून जातो. आज जरी इंटरनेटचा प्रसार कमी असला तरी तो येत्या पाच वर्षांमध्ये कित्तेक पटीने वाढणार आहे. हि वाढ मोबाईल, स्वस्त इंटरनेट व आपल्याला लागलेले त्याचे वेसन या जोरावर बलाढ्य होणार आहे. वर्तमान पत्र, रेडिओ, टीव्ही यासारखी माध्यमे या इंटरनेटसमोर कमकुवत व निष्प्रभ ठरत आहेत. नवी पिढी या इंटरनेटचा पुरेपूर वापर करून त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी या इंटरनेटचा फायदाच करून घेत आहेत. इंटरनेट जरी आपल्याला ग्राहक बनवत असले तरीही आपल्याला सुद्धा त्याला आपले ग्राहक बनवून आर्थिक उन्नती साधता येते. असे असले तरी आपण इंटरनेटचा वापर पूर्ण समजून घेऊन करणे गरजेचे आहे. ऑनलाइन पेमेंट असो किंवा वधूवर सूचक वेबसाइट किंवा जाहिराती यांच्यापासून लांब न राहता पूर्ण समजून घेऊन योग्य ती काळजी घेऊन आपण या इंटरनेटवर स्वार होऊ शकतो. मूलतः इंटरनेटला घाबरण्याचे किंवा त्यातील काही गोष्टींना घाबरण्याचे कारण नाही. इंटरनेट हा पूर्णतः निष्पक्ष व खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीचे माध्यम आहे. आणखी एक महत्वाची बाब अशी की इंटरनेटच्या विस्ताराबरोबरच संरक्षणाचे तंत्रज्ञानसुद्धा त्याच गतीने सक्षम होत आहे. त्यामुळे काही वर्षातच आत्ताचे सुरक्षिततेचे काही प्रश्न उरणारच नाहीत. ऑनलाईन पेमेंट, बुकिंग व वैयक्तिक गोपनीयता यासारखे प्रश्न उरणार नाहीत. आपण सध्या या इंटरनेटचे ग्राहक तर बनलोच आहोत मग आपण चार पाऊले पुढे जाऊन, का नाही आपल्या प्रगतीसाठी उपयोग करावा?
Comments
Post a Comment